Jamkhed : अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन महिला गंभीर जखमी

खर्डा जवळील दरडवाडी कॉर्नर येथील घटना

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
खर्डा जवळील दरडवाडी कॉर्नरवर अज्ञात वाहनाच्या धडकेने दोन शेळ्या ठार तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यातील एकीची प्रकृती चिंताजनक आहे.
याबाबत माहिती अशी की खर्डा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य राधाबाई शिरसाट व इंदुबाई खाडे या आपल्या शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. शेतातील काम आटोपल्यानंतर त्या घराकडे चालल्या होत्या. त्यावेळी अचानक पाऊस आल्यामुळे या दोघी दोन शेळ्यांना घेऊन दरडवाडी कॉर्नरच्या बाभळीच्या झाडाखाली बसल्या असता त्यावेळी एक अज्ञात पीक अप गाडीने त्यांना जोरदार धडक दिली.
त्यांच्यासोबत असलेल्या दोन शेळ्या जागीच गतप्राण झाल्या आहेत. या दोघींना तातडीने तेथील रहिवासी विनोद खाडे यांनी जामखेड येथील खाजगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले. यामध्ये इंदुबाई खाडे यांचे दोन्ही हात पाय मोडले आहेत तर माजी ग्रामपंचायत सदस्य राधाबाई शिरसाठ यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे खाडे यांनी सांगितले. ही धडक दिलेले वाहन घटनास्थळावरून तातडीने प्रसार झाले. यानंतर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here