Aurangabad : मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा – डॉ. शिवानंद भानुसे

3

जातनिहाय जनगणना करण्याची मागणी

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
 
औरंगाबाद : गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रश्न भिजत पडला असून राज्यशासनाने मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी शनिवारी (दि.१९) पत्रकार परिषदेत केली. तसेच देशात जातनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी जोरदार मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

मराठा सेवा संघाच्या वतीने गेल्या ३३ वर्षापासून मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. कोपर्डी येथील अत्याचाराच्या घटनेनंतर मराठा समाजाला आदर्श ठरतील, असे ५८ मोर्चे महाराष्ट्रात काढण्यात येऊन मराठा समाजाला आरक्षण मिळावे. यासाठी तीव्र आंदोलन करण्यात आले आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे. यासाठी गायकवाड आयोगाने केलेल्या शिफारसी स्वीकारून मराठा समाजाचा समावेश सरसकट ओबीसीमध्ये करण्यात यावा, तसेच ओबीसीमध्ये ज्याप्रमाणे वेगवेगळे वर्ग आहेत तशीच एक कॅटेगिरी तयार करून मराठ्यांना आरक्षण द्यावे, असे देखील डॉ. भानुसे यांनी एका प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.

दरम्यान, स्वातंत्र्यानंतर देशात एकदाही जातीनिहाय जनगणना झालेली नाही. केंद्र व राज्य शासनाने जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणी देखील यावेळी डॉ. भानुसे यांनी केली. तसेच राज्यात लवकरच होणाNया पोलिस भरती स्थगित करण्यात येऊन मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतरच पोलिस भरती करण्यात यावी अशी मागणी देखील डॉ. भानुसे यांनी केली. या पत्रकार परिषदेस संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, राम भगुरे, महानगर अध्यक्ष वैशाली खोपडे, रेखा वहाटुळे, रेणूका सोमवंशी, रविंद्र वाहटुळे आदींची उपस्थिती होती.

मराठा आरक्षणासाठी शासनाची उदासीन भूमिका
मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश केल्यास ओबीसी समाजाचे नेते दुखावले जातील अशी भिती वाटत असल्याने वेंâद्र व राज्य शासन मराठा आरक्षणासाठी उदासीन भूमिका घेत असल्याचा आरोप डॉ. शिवानंद भानुसे यांनी यावेळी केला. तसेच मराठा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात केला नाही तर संभाजी ब्रिगेड स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here