करजगाव परिसरातील रस्त्यांना आले तळ्याचे स्वरूप

कपाशी, सोयाबीन, उस पिकांचे नुसकान

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
 
करजगाव : मुळा काठ परिसरातील करजगाव, शिरेगाव, लांडेवाडी, तामसवाडी गणेशवाडी, निंभारी, अंमळनेर, वाटापूर, शिरेगाव, खेडले-परमानंद आदी परिसरात वाऱ्यासह झालेल्या उत्तरा नक्षत्राच्या जोरदार पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या नुसकान झाले. करजगाव परिसरात ८८ मिमी पावसाची नोंद झाली. दररोज पाउस होत असल्यामुळे या पावसाला आता नागरिक कंटाळले आहे. 

ओढ्या नाल्यांना पाउस आल्यामुळे परिसरातील सर्वच रहदारी बंद झाली होती. तसेच शेतात राहणारे व सखल भागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पावसाचे व ओढ्यांचे पाणी शिरल्यामुळे संसारिक वस्तूंचे नुसकान झाले. यात विशेषता सोयाबीन, कपाशी, जनावरांचा चारा पिके, भाजीपाल्याचे पिके, तसेच उसालाही या वाऱ्याचा व पावसाचा तडाखा बसला. अंमळनेर येथील पोपट घावटे यांचे तोडणीस आलेले कारल्याचे पिक भुई सपाट झाले.

तसेच पानेगाव येथील अॅड किरण जंगले यांचे उसाचे पिक खाली पडल्यामुळे नुसकान झाले. तसेच करजगाव येथील शेतात राहत असलेल्या शरद आढाव यांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यामुळे दोन दिवस जागून काढावे लागले. नुसकान झालेल्या पिकाचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here