Aurangabad : पोलिसांकडून मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न

मराठा आंदोलकांना क्रांती चौकातून अटक

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम स्थगिती मिळाल्यानंतर मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे रविवारी दि.२० रोजी सकाळी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज क्रांती चौकात मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आंदोलक आंदोलनास्थळी दाखल होताच पोलिसांनी अटक केली.

यावेळी एक मराठा लाख मराठा, मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, पोलीस भरतीला स्थगिती मिळालीच पाहीजे या घोषणेणे परिसर दणाणून सोडला होता. पोलिसांनी दडपशाही करून आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेले सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरते स्थगित केले. या निर्णयामुळे राज्यातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. मराठा समाजाच्या उमेदवारांना  नोकरीच्या राखीव जागापासून लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here