Rahuri : देवळाली प्रवरातील गवळी माळ तलाव फुटला, पुराचा धोका

नागरिकांनी सतर्क राहावे – तहसीलदार शेख

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

देवळाली प्रवरा येथील गवळी माळ तलाव फुटला असून देवळाली प्रवरा गावाला पुराचा धोका निर्माण झाला असल्याने देवळाली प्रवरा येथील नागरिकांनी सतर्क राहण्याची सूचना तहसीलदार फसियोद्दिन शेख यांनी दिल्या आहेत.

देवळाली प्रवरा येथील गुहा सिवे लगत नगर मनमाड रस्त्या लागून असलेला गवळी माळ नावाने ओळखला जाणारा तलाव अतिवृष्टीमुळे फुटला असून त्याच्या भिंतीला पाच फूट व्यासाचे मोठे भगदाड पडले. ही बाब येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या  लक्ष्यात आल्याने त्यांनी तातडीने राहुरीचे तहसीलदार फसियोद्दिन शेख साहेब यांना दूरध्वनी करून कळविले.

या गवळी माळ तलावाच्या आणि देवळाली प्रवरा गावात कडू कदम वस्ती लगत आणखी तीन तलाव असल्याने गवळी माळ तलाव फुटला तर खालचे कदम कडू वस्तीवरील तिन्ही तलाव फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक शेतकरी  यांनी तहसीलदार शेख यांच्या लक्षात आणून दिल्याने तहसीलदार फसियोद्दिन शेख साहेब, मुख्याधिकारी निकत साहेब,  सर्कल कानडे, तलाठी साळवे, देवळाली प्रवरा नगरपरिषद आपत्ती व्यस्थापन कक्ष्याचे सर्व कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

याप्रसंगी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला योग्य त्या सूचना देवून या ओढ्यालगत राहणाऱ्या देवळाली प्रवराच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन राहुरीचे तहसीलदार फसियोद्दिन शेख यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here