उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बनवणार फिल्म सिटी

  3

  कंगनाने मानले आभार

  उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देशात एका फिल्म सिटीची गरज असून उत्तर प्रदेश ही जबाबदारी घ्यायला तयार आहे, असे सांगत नवीन फिल्म सिटी बनवण्याची घोषणा करण्यात आली. यासाठी नोएडा, ग्रेटर नोएडा आणि यमुना एक्सप्रेस वे ही ठिकाणं फिल्म सिटी तयार करण्यासाठी उत्तम असल्याचं सांगितलं.

  यावर कंगनाने आभार मानत ट्विट केले आहे, ‘योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या घोषणेचं मी समर्थन करते. आम्हाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक रिफॉर्म्सची गरज असते. सर्वात आधी आपल्याला एका मोठ्या फिल्म इंडस्ट्रीची गरज आहे. जी भारतातील चित्रपट उद्योग म्हणून ओळखली जाईल. हॉलिवूडलाही याचा फायदा मिळू शकेल. एक इंडस्ट्री परंतु, अनेक फिल्म सिटी.’

  काय म्हणाले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ?
  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, ‘देशात एका उत्तम फिल्म सिटीची गरज आहे. उत्तर प्रदेश ही जबाबदारी घेण्यासाठी तयार आहे. आम्ही एक उत्कृष्ट सिटी तयार करणार आहोत. फिल्म सिटीसाठी नोएडा, ग्रेटर नोएडा आणि यमुना एक्सप्रेसवे ही ठिकाणं उत्तम आहेत. ही फिल्म सिटी चित्रपट निर्मात्यांसाठी एक उत्तम पर्याय ठरेल. तसेच रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीनेही उत्तम पर्याय असेल. यासाठी लवकरच योजना तयार करण्यात येईल.’

  3 COMMENTS

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here