Shrigonda : पाचपुते यांच्या प्रयत्नाने तालुक्याला मिळाले दोन व्हेंटिलेटर

आमदार निधीतून आवश्यक साहित्य घेणार – आ. पाचपुते

सध्या श्रीगोंदा शहर व तालुक्यात कोरोनाची वाढती संख्या व उपचारासाठी रुग्णांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आमदार बबनराव पाचपुते यांनी मागणी केल्यामुळे तीन मोठे व्हेंटिलेटर मिळाले असून त्यापैकी एक चिचोंडी पाटील येथील रुग्णालयाला तर दोन श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देण्यात आले.
श्रीगोंदा तालुक्यात सध्या कोरोनाचा प्रभाव वाढत चालला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या मोठ्या झपाट्याने वाढू लागली आहे. परिणामी रुग्णांना उपचारासाठी अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे जिल्हाधिकारी यांचेकडे आमदार पाचपुते यांनी  व्हेंटिलेटरची मागणी केली होती. त्यानुसार आज चिंचोडी पाटील येथील रुग्णालयाला एक व श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयाला दोन व्हेंटिलेटर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त लोकार्पण केले आहे.

यावेळी आमदार बबनराव पाचपुते, भाजप प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, प्रसाद ढोकरीकर, तालुकाध्यक्ष संदीप नागवडे व सर्व नगरसेवक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here