Beed : जिल्ह्यात जास्तीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – धनंजय मुंडेंचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

प्रातिनिधिक छायाचित्र
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
बीड जिल्ह्यात जवळपास सर्वच भागात गेल्या दोन दिवसात झालेल्या अधिकच्या पावसाने कापूस, सोयाबीनसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, याबाबत प्रशासनाने तात्काळ झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.
बीड, गेवराई, वडवणी सह अन्य जवळपास सर्वच तालुक्यात गेल्या दोन अधिक दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साठले आहे.
कापूस व सोयाबीन या दोन प्रमुख पिकांना यामुळे मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यानुसार महसूल मंडळ निहाय गावोगावी बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, असे मुंडे यांनी म्हटले आहे.
बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, वडवणी या भागात गेल्या तीन दिवसात झालेला पाऊस आणि येत्या चार दिवसांमध्ये वर्तवलेले पावसाचे अंदाज यावरून नुकसान अधिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हाप्रशासनाला तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे धनंजय मुंडे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here