Shirurkasar : अन् अंधाच्या अंत्यविधीला धावून आला माउली

3

स्वतः अग्नीडाग देऊन निभावले सामाजिक कर्तव्य 

प्रतिनिधी | जगन्नाथ परजणे | शिरूरकासार

समाजात काही माणसं सामाजिक कार्यात झोकून देऊन निस्वार्थ काम करणारी आहेत. त्यापैकीच एक म्हणजे शिरूरकासार तालुक्यातील पाडळी गावचा माऊली सिरसाट. दोन दिवसांपूर्वी बीड तालुक्यातील साक्षाळपिंप्री येथील कुटुंबातील सर्वच अंध असलेल्या एकाचा मृत्यू झाला. या कुटुंबासाठी दु:खाच्या समयी माऊली धाऊन आला अन् खांदेकरी,अग्नीडाग देऊन सामाजिक कर्तव्य निभावले.
बीड जिल्ह्यातील सामाजिक कार्यात गेली 15 ते 20 वर्षांपासून चळवळीत राहून जनसेवा ही ईश्वर सेवा समजून निस्वार्थपणे
सेवा करणारा म्हणजे माऊली सिरसाट. तब्बल 1000 वयोवृद्ध माणसांच्या डोळ्यांचे ऑपरेशन डॉक्टरांच्या माध्यमातून मोफत केली. गावच्या शिवार नदीकाठी 1000 झाडे लाऊन संगोपन केले. दुष्काळात स्वतः बोरमधून संपूर्ण गावाला  मोफत पाणी दिले. परिसरात प्रत्येक वर्षी पद्मश्री डॉ. तात्यासाहेब लहाणे, लालचंद गोयल यांना बोलावून शिबिर घेतात. कुठे पशूपक्षी जखमी आढळून आला. तर स्वतः दवाखान्यात घेऊन जाऊन त्याला बरं करणे, एखादा मरण पावला तर अंत्यविधी देखील करतात.
गावच्या गटारी काढण्यापासून ते झाडू घेऊन स्वच्छता राबविण्याचे काम त्यांनी केलेले आहे. दुष्काळात पशुपक्ष्यांना खाद्य व पाणी घेऊन जाऊन अनेकांना जीवदान दिले असून गुणवंतांचा गुण गौरव, मुलींच्या जन्माचे स्वागत जिल्हाधिकारी भारत रासणे यांना पाडळी या ठिकाणी आणून सुरुवात केली. दरवर्षी ते मुलीच्या जन्माचे कार्यक्रम घेतात. लॉकडाऊनमध्ये गोरगरिबांना किराणा, कपडे, धान्य वाटप केली. दिव्यांगांना दिव्यांगदिनी दरवर्षी कपड्यांचे वाटप, असे अनेक कार्यक्रम घेऊन सेवा करतात. त्यामुळे सर्वत्र सुख दु:खात सहभागी होणारा, प्राणी पशुपक्षी व तहानलेल्यांना पाणी भुकेलेल्यांना अन्न, अंधांना काठीरूपाचा आधार कोणत्याही प्रश्नासाठी हाकेला धाऊन आपला माणूस म्हणून माऊलीकडे पाहिले जाते.
ते काही वर्षांपूर्वी सप्ताहाच्या काळात कुटुंबातील सर्वच अंध असलेली मंडळी चांगले गायन करतात. हे पाहिल्यावर साक्षाळपिंप्री या गावी जाऊन त्यांना दत्तक घेतले. सहा अंध व्यक्तींना डॉ. तात्यासाहेब यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर अनुवंशिकतेमुळे त्यांना दृष्टी मिळू शकत नाही, असे सांगितले. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून विभागामार्फत मदत मिळवून दिली. यातील मुरलीधर साठे या व्यक्तीचा दोन दिवसापूर्वी मृत्यू झाला. अन् माऊली त्यांच्यासाठी धावून येऊन खांदा देण्यापासून ते अग्नीडाग देण्याचे सामाजिक काम केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर माणसांतही देव असतो, यावर माऊली यांच्याकडे पाहिल्यावर विश्वास वाटतो.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here