Aurangabad : परगावी गेलेल्या कामगाराचे घर फोडले

तीसगावात घडली घटना

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
 
परगावी गेलेल्या दैनिकातील कामगाराचे घर फोडून चोरांनी सव्वालाखांचा ऐवज लांबवला. हा प्रकार १९ सप्टेंबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आला. यापूर्वी देखील एमआयडीसी वाळूंज भागात गेल्या दोन महिन्यात अनेक घरफोड्या झाल्या. मात्र, एकही घरफोड्याला पकडण्यात पोलिसांना अद्याप तरी यश आलेले नाही.

एका दैनिकातील गणेश कारभारी माळवदे (३०, रा. फ्लॅट क्र. ३०१, अष्टविनायक पार्क  हाऊसिंग सोसायटी, तीसगाव, वाळुज) हे १६ सप्टेंबर रोजी श्रीरामपूरातील चांदेगावला येथे  कुटुंबियांना भेटायला गेले होते. याची संधी साधून चोराने त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले. त्यानंतर आत शिरल्यानंतर चोरांनी कपाटाचे कुलूप तोडले. त्यातून १४ ग्रॅमचे सोन्याचे गंठण, पाच ग्रॅमचे मंगळसूत्र, आठ ग्रॅमच्या दोन अंगठ्या, कानातील तीन ग्रॅमच्या रिंगा आणि अकरा हजाराची रोकड लांबवली.

हा प्रकार १९ सप्टेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आला. त्यावरुन एमआयडीसी वाळूंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here