‘त्याच’ टोळीने चोरल्या होत्या श्री क्षेत्र कोरठण येथील पादुका…

पोलीस जबाबात सत्य आले समोर; तपासाचे सर्वच स्तरातून कौतुक

दत्तात्रय गाडगे । राष्ट्र सह्याद्री

पारनेर  : राहत्यामधील विरभद्र मंदीरातील धाडशी मुर्ती चोरीचा तपास लावताना, चोराच्या जबाबामधुन पारनेरमधील श्रीक्षेत्र कोरठणच्या नविन म्हाळसा-खंडोबा मंदीरासमोरुन चोरी गेलेल्या चांदीच्या पादुकांचा शोध लागला आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा व पोलीसांचे भाविकभक्त, देवस्थान ट्रस्टकडुन कौतुक करण्यात येत आहे.

अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत ब वर्ग तिर्थक्षेत्र असणार्‍या पारनेर तालुक्यामधील श्रीक्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगांवरोठा, ता. पारनेर येथील नविन खंडोबा- म्हाळसा मंदीरासमोरील फरशीवरील २० हजार रुपये किमतीच्या चांदीच्या पादुकां अज्ञात चोरट्यांनी सोमवार दि. २० जुलै रोजी पहाटे ३ वाजता चोरुन नेल्या होत्या. कोरोनाचे पार्श्वभूमिवर मंदीर बंद होते. लाईट गेलेली असताना अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी चांदीच्या पादुका पळविण्यात यशस्वी झाले होते. त्यानंतर राहता येथील ग्रामदैवत वीरभद्रमहाराज मंदीरातील चांदीच्या मूर्तींच्या झालेल्या धाडशी चोरीचा तपास लावताना, पोलीसांना पारनेरमधील श्रीक्षेत्र कोरठण येथील नविन म्हाळसा खंडोबा मंदीरासमोरील चांदीच्या पादुकांचा तपास चोरांच्या जबाबामधुन लागला आहे. आरोपी भास्कर खेमाजी पथवे वयवर्ष ४२ राहणार नांदुरी, तालुका संगमनेर याला चोरीच्या मुद्देमालासह पोलीसांनी १८ सप्टेबरला ताब्यात घेतले आहे. सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे देणार्‍या चोराला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने सदरचा गुन्हा साथीदाराचे मदतीने केल्या कबुली दिली आहे. त्याच्या साथीदाराचा शोध घेतला परंतु तो अजुन सापडला नाही. चोरांकडुन तब्बल ३ लाख ८५ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आलाय.

पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीने चोरीची कबुली दिली असुन, आरोपी भास्कर खेमाजी पथवे वय ४२ रा.नांदुरी दुमाला, ता.संगमनेर याने नांदुरी दुमाला येथील शेतात सर्व मुद्देमाल ठेवला होता. मुद्देमालासह चोराला राहता पोलीस स्टेशनला हजर केले आहे. पुढील तपास राहता पोलीस करत आहेत.

 ही गौरवपूर्ण कामगीरी करणारे पोलीस अधिक्षक अखिलेशकुमारसिंह, अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली कांबळे, सागर पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांचे मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, एपीआय किशोर देशमुख, पोलीस हेडकाँन्स्टेबल सुनिल चव्हाण, दत्ता हिंगडे, मनोज गोसावी, संदीप पवार, शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, दिपक शिंदे, काँन्स्टेबल योगेश सातपुते, सागर सुलागे, राहुल सोळुंके, मच्छिंद्र बढे, देवीदास काळे, संभाजी कोतकर यांच्या विशेष तपास पथकाने हा शोध लावला आहे.

त्यासाठी पारनेरचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी, पोलीस उपनिरीक्षक पद्मने, सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ, गुप्त वार्ता विभागाचे दिवटे, ठसेतज्ञ, श्वानपथक यांचेही विशेष सहकार्य लाभले आहे. भाविकभक्त, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड्. पांडुरंग गायकवाड, विश्वस्थ यांचेसह सर्व थरामधुन स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा व पोलीस प्रशासनाचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. 

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here