राधिका आपटे, रिचा चढ्ढा यांनी केले अनुराग कश्यपचे समर्थन

  0

  पायल घोषने अनुरागवर लावलेल्या आरोपानंतर अनेक अभिनेत्री त्याच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत. 

  लेखक-दिगदर्शक अनुराग कश्यपवर पायल घोष हिने एका मुलाखतीच्या दरम्यान लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले आहेत. त्यानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी अनुरागचे समर्थन करीत त्याची पाठराखण केली आहे. यामध्ये राधिका आपटे, रिचा चढ्ढा यांच्यासह अनुरागची पहिली पत्नी देखील आहे. 

  राधिका म्हणते, अनुराग सोबत मला खूप सुरक्षित वाटते. आपल्याला एकमेकांबद्दल असलेला आदर आणि प्रेम महत्वाचं आहे. तर पायल घोषने मुलाखती दरम्यान रिचा चढ्ढाचेही नाव घेतले होते. याबाबत रिचाच्या वकिलांनी खुलासा केला आहे की या प्रकरणाशी रिचाचा काहीही संबंध नाही.

  त्याची पहिली पत्नी आरती बजाजनेही यावर अनुरागची बाजू घेतली. त्याच्यावर आरोप झाल्यानंतर आरतीनेही आपल्या इन्स्टावरच्या पोस्टवरून पायलच्या या आरोपांचं खंडन केलं आहे. ती म्हणते, ‘इतका नीच पातळीवरचा आरोप अशा पद्धतीने होईल याचा मी कधीच विचार केला नव्हता. अनुराग हा कसा आहे? हे आम्हा सगळ्यांना माहीत आहे. असं असताना मी टू सारख्या शस्त्राचा एखाद्याला बदनाम करण्यासाठी वापर करणं निखालस चूक आहे.’

  कंगनाने मात्र पायलची बाजू घेत अनुरागला अटक करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे राजकीय विचारसरणीतून तर अनुरागवर हे आरोप केले जात नाहीत ना याचीही चर्चा सुरू आहे.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here