Kada : कड्याचा पाणी प्रश्न मिटला, चार वर्षानंतर प्रथमच कडी नदी वाहू लागली

0
सरपंच दीपमाला ढोबळेंकडून जलपूजन
कड्याला पाणी पुरवठा करणारा देवीनिमगावचा लिबोडी तलाव नुकताच झालेल्या परतीच्या पावसामुळे शंभर टक्के भरला आहे. त्यामुळे तहानलेल्या कडेकरांचा पाणी प्रश्न मार्गी लागला असून चार वर्षानंतर प्रथमच कडी नदी वाहू लागली आहे. सरपंच दीपमाला ढोबळे यांच्या आज हस्ते जलपूजन करण्यात आले.

यावर्षी पावसाळा सुरु होऊन तीन महिने लोटले होते. मात्र, कडेकरांना पावसाची प्रतीक्षा होती. परंतू मागील आठवड्यात परतीच्या पावसाने धामणगाव परिसरात दमदार हजेरी लावल्यामुळे कडेकरांना मोठा दिलासा मिळाला. त्यामुळे कड्याला वर्षानुवर्षे पाणी पुरवठा करणारा देवीनिमगावचा लिंबोडी तलाव चारच दिवसात शंभर टक्के पूर्ण क्षमतेने भरला आहे. चार वर्षानंतर प्रथमच कडी नदी वाहू लागली असून कडेकराांचा आनंद पारावार राहिलेला नाही. सरपंच दीपमाला अनिल ढोबळे यांच्या हस्ते खळखळणा-या नदीच्या पाण्याचे जलपूजन करण्यात आले.
याप्रसंगी सरपंचपती अनिल ढोबळे, उपसरपंच योगेश भंडारी, संभाजी कर्डिले, ग्रामविकास अधिकारी आबासाहेब खिलारे, ग्रा प सदस्य नागेश कर्डिले, प्रशांत देशमुख, अन्सार सय्यद, रमेश देशमुख, परमेश्वर कर्डिले, बंटी गायकवाड, छगण कर्डिले, सचिन शिंदे, संपत कर्डिले, युवराज खिलारे, दादा कदम, मधुकर कर्डिले, सर्जेराव करांडे, जगताप  आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here