Shrigonda : विसापूरच्या पाण्याचे आमदार पाचपुते यांच्या हस्ते जलपूजन 

2

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

विसापूर धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्यामुळे आज आमदार बबनराव पाचपुते यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. सध्या धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे कुकडीच्या धरणातील अतिरिक्त पाणी विसापूर तलावात सोडण्यात आले आहे.

हा तलाव भरल्यामुळे या तलावाखालील गावांना उन्हाळ्यात फायदा होणार आहे. या तलावाखाली मोठ्या प्रमाणात शेती आहे. त्यामुळे या भागात ऊस हे महत्वाचे पीक येत असून या पाण्याचा या भागातील शेतीला नक्कीच फायदा होणार आहे.

आज आमदार बबनराव पाचपुते यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा बँक संचालक दत्तात्रय पानसरे माजी जिल्हा परिषद सदश्य दिनकर पंढरकर, माजी उपसभापती गणपत काकडे, बाबासाहेब सरोदे, भाऊसाहेब इथापे, धनंजय शिंदे, जब्बार सय्यद, नितीन नलगे आदी उपस्थित होते.

2 COMMENTS

  1. I have recently started a website, the info you provide on this website has helped me greatly. Thank you for all of your time & work. “It is a great thing to know our vices.” by Cicero.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here