Shirurkasar : तालुक्यात संततधार पावसामुळे खरिपाच्या सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान

1
भरपाईची रामराव खेडकर, एम एन बडेसह शिरूर भाजपची मागणी
संततधार पडत असलेल्या पावसामुळे शिरूरकासार तालुक्यातील खरिपाची सर्वच पिके वाया गेली असून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते रामराव खेडकर यांच्यासह तालुका सरचिटणीस एम एन बडे यांच्यासह शिरूर भाजपाच्या वतीने तहसीलदार राम बेंडे यांना निवेदन देऊन करण्यात आली.
तालुक्यात या वर्षी पावसाने कहर मांडला असल्याने सतत पडत असलेल्या पावसामुळे हाती येऊ लागलेली. सर्वच वाया चालली आहेत. त्यामुळे बळीराजा पूर्ण घाबरला असून गेली पाच ते सहा वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसलेल्या
शेतकरी राजाला यावर्षी पिक येतील, अशी आस होती. परंतु गेली काही दिवसांपासून आलेल्या पिकांचे सतत सुरू असलेल्या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असून कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना किमान खरीप हंगामातील पिंकाचा आधार मिळून उदरनिर्वाह भागेल असे वाटले.
परंतु घडले उलटेच. अतिवृष्टीने शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे तात्काळ पंचनामे करुन तातडीने मदत मिळवून द्यावी नसता भाजपच्या वतीने तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य भागीरथी रामराव खेडकर,भाजपचे तालुका सरचिटणीस एम एन बडे यांच्यासह शिरूरकासार भाजपच्या वतीने तहसीलदार श्रीराम बेंडे यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते रामराव खेडकर, रामदास बडे, पंचायत समिती सदस्य प्रकाश खेडकर, युवा नेते पै. माऊली पानसंबळ, सरपंच माऊली नागरगोजे, उपसरपंच संजय शिरसाट, किशोर खोले, बाबुराव केदार, मधुकर जायभाये यांच्याही निवेदनावर सह्या आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here