Aurangabad : विवाहितेवर अत्याचार प्रकरणी आरोपीस बुधवारपर्यंत पोलीस कोठडी

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

आंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर बळजबरी वारंवार बलात्कार प्रकरणी नातेवाईक तरुणाला क्रांतीचौक पोलिसांनी रविवारी (दि. २०) गजाआड केले. सुशांत रामकृष्ण कुळकर्णी (वय २५, रा. करमाड), असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला बुधवारपर्यंत (दि. २३) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी.एस. वमने यांनी दिले. 

प्रकरणात ३० वर्षीय विवाहित पीडितेने तक्रार दिली. तक्रारीनुसार, आरोपी हा पीडितेच्या पतीचा नातेवाईक आहे. तो नेहमी पीडितेच्या पतीला भेटण्यासाठी पीडितेच्या घरी येत होता. ऑगस्ट २०१९ मध्ये पीडितेचा पती कामाला गेला असता आरोपी पीडितेच्या घरी आला. त्याने मोबाइलमधील पीडितेचा जुना आंघोळ करतांनाचा व्हिडिओ पीडितेला दाखवला व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने पीडितेवर वारंवार बळजबरी बलात्कार केला. तो पीडितेला फोन करुन अश्लील बोलण्यास व अश्लील फोटो टाकण्यास सांगत होता, याला विरोध केल्यास तो पीडितेला हाताने व बेल्टने मारहाण करीत होता.

मे २०२० मध्ये आरोपीने पीडितेच्या पतीच्या मोबाइलवर मॅसेज टाकून पीडितेसोबतच्या संबंधाबाबत सांगून कुटूूंबाला जीवे मारण्याची धमकी देत होता. पीडितेच्या पतीसह इतर नातेवाईकांनी आरोपीला समजाविण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांना धमकी दिली व स्वत:ही मरण्याची धमकी दिली. प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here