Shirurkasar : मातृत्वापासून पारखी झालेल्या पाखरांच्या पिल्लांना मिळाली सर्पराज्ञी मातृत्वाची उब

निसर्ग प्रेमींची मिळाली साद

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

काडी काडी जमवून करकोचाच्या जोडीनं घरटं उभारलं… मातृत्वाचं स्वप्नही पाहिलं… स्वप्न साकारलं… चांगली तीन पिल्ले जन्माला आली. मात्र, हे मातृत्व नियतीला मान्य नव्हतं, की काय?… अचानक त्यांचं घरटं उद्ध्वस्त केलं गेलं. उद्ध्वस्त घरट्यातील ते निष्पाप जीव आर्त हाकेन मातृत्वाच्या कुशीत दोन दिवस केकारत होती. उद्ध्वस्त घरट्याकडे पाहत. अखेर दोन दिवसाच्या आर्त हाकेला निसर्गप्रेमीची साद मिळाली. अन् ही पिल्लं सर्पराज्ञीच्या मातृत्वाच्या कुशीत विसावली.

पाच दिवसांपूर्वी सोहेल शेख यांना पाथरूड येथे करकोचा पक्ष्याचे उद्ध्वस्त केलेले घरटं व त्यांची तीन पिल्लं दिसून आली होती. त्यांनतर त्यांनी ही पिल्लं उचलून घरी आणली. मात्र, त्यातील एका पिल्लांचा पाय मोडला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनतर त्यांनी या पक्ष्यांची माहिती त्यांचे मित्र अन्वर शेख, जालिंदर भसकरे, डॉ. शशिकुमार सवाई, यांना दिली. त्यांनतर या निसर्गप्रेमी युवकांनी वेळ न दवडता ताबडतोब सर्पराज्ञीशी संपर्क साधून सर्पराज्ञीत आणून दिले. त्यांनतर या पिल्लांची तपासणी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय चौरे व विश्वास चौरे यांनी पाहणी करून पाय मोडलेल्या पिल्लांच्या पायाला प्लास्टर केले. मातृत्वापासून पारखी झालेल्या या पिल्लांना सर्पराज्ञीत मातृत्वाची उब मिळत असल्याने चांगलीच बाळसं धरू लागली.
पिल्लांचे नामकरण – अमर, अकबर, एंथोनी*

सर्पराज्ञी आलेल्या प्रत्येक प्राण्यांचे नामकरण केले जाते. या ही पिलांचे नामकरण केले आहे .अमर (थोरला), अकबर (मधला), अँथोनी(धाकटा), असे नामकरण सर्व धर्म समभावनेतून केले, असल्याचे सृष्टी सोनवणे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here