Beed : मुख्यमंत्री, सहकार मंत्री, साखर संघाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळेच ‘वैद्यनाथ’ला मिळाली थकहमी – पंकजा मुंडे

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
मुख्यमंत्री, सहकार मंत्री, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि साखर कारखाना संघाकडे आपण वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळेच वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारने १० कोटी ७७ लाख रूपये थकहमी मंजूर केली आहे. यात इतरांनी श्रेय घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने राज्यातील ३२ साखर कारखान्यांना थकहमी मंजूर करण्याचा निर्णय घेतला. कारखान्यांची यादी यापूर्वीच जाहीर झाली होती. या यादीत वैद्यनाथ कारखानाही होता. या कारखान्याला थकहमी मिळावी यासाठी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व साखर कारखाना संघाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याचेच फलित म्हणून सरकारने कारखान्याला १० कोटी ७७ लाख रूपयाची थकहमी देण्याचा निर्णय घेतला आहे, याबद्दल पंकजा मुंडे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here