Aurangabad : घरफोडीतील आरोपी सहा महिन्यानंतर गजाआड

पुंडलीकनगर पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

सहा महिन्यापूर्वी गारखेडा परिसरातील जय गजानन नगरातील दुकानदाराचे घर फोडून ३२ हजार रूपये लंपास करणा-या रेकॉर्डवरील चोरट्यास पुंडलिकनगर पोलिसांनी गजाआड केले. शुभम उर्फ संभाजी शाम पिंपळे (वय २२, रा.चित्तेगाव) असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीचे नाव असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी कळविली आहे.

प्रल्हाद कचरु काथार (वय ४५ रा. जयगजानन नगर, गल्ली क्रमांक सहा गारखेडा परिसर), यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ८ मार्च रोजी पलंगाच्या गादीखाली ठेवलेले ३२ हजार रूपये चोरून नेले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी विजय उर्फे टग्या सोमनाथ पिपंळे (वय २२ रा. मुकुंदवाडी) याला अटक केली होती. परंतु त्याचा साथीदार शुभम उर्फ संभाजी पिंपळे हा फरार होता.

शुभम उर्फ संभाजी पिंपळे हा बुधवारी चित्तेगाव शिवारात आला असल्याची माहिती मिळाल्यावर पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, जमादार एल.बी.हिंगे, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, प्रविण मुळे, राजेश यदमळ, विलास डोईफोडे शुभम उर्पâ संभाजी पिंपळे याला ताब्यात घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here