Aurangabad : माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांना विधानपरिषदेवर घ्या; नगरसेवक अफसर खान यांची मागणी

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राज्याचे माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांना विधान परिषदेवर घेण्याची मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अफसरखान यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. अफसर खान यांनी खा. राहुल गांधी, काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी, महाराष्ट्र प्रभारी एच.डी.पाटील, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री तथा कँबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांना पत्र ही मागणी पाठवून ही काँग्रेस पक्षाकडे केली आहे. त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

दर्डा 1980 पासून समाजकार्यात आहेत. तीनदा आमदार म्हणून दर्डांनी प्रतिनिधित्व केले. मंत्री असताना सुरक्षेसाठी भारत बटालियन, इंटरनँशनल विमानतळ, मुस्लिम समाजासाठी पवित्र हज यात्रेसाठी थेट औरंगाबाद विमानतळावरुन सुविधा उपलब्ध करून दिली. कँन्सर हॉस्पिटल निर्माण केले. घाटीत विविध पायाभूत सुविधा सिटीस्कँन, एक्सरे, सोनोग्राफी सुविधा, मेडीसिन बिल्डिंग निर्माण कार्य, व्यापा-यांसाठी मुंबई जाण्यासाठी जनशताब्दी एक्सप्रेस सुरु केली.

शहराच्या विकासासाठी अहोरात्र झटले. सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी नेहमी प्रयत्न केले. काँग्रेस पक्ष मराठवाडा व शहर आणि जिल्ह्यात मजबूत करण्यासाठी परिश्रम घेतले. त्यांचे मोठे भाऊ विजय दर्डा राज्यसभेचे सदस्य असताना मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी शहराच्या विकासावर खर्च केला. औरंगाबादच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. तरी कॉग्रेसने लवकर निर्णय घेवून राजेंद्र दर्डांना विधानपरिषदेवर सदस्य म्हणून घेण्यात यावे अशी विनंती मा.नगरसेवक अफसरखान यांनी केली आहे.

दरम्यान, अफसरखान हे मागील 25 वर्षांपासून नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहे. तीनदा मनपाचे विरोधी पक्षनेता, एकदा सभापतीपद त्यांनी भूषविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here