Shrigonda : एनएसएसच्या आजी-माजी विद्यार्थ्यांच्या कार्याची दखल, पोलीस मित्रांचा ट्रॅकसूट देऊन सन्मान

श्रीगोंदा शहर मंडप, लाईट डेकोरेटर्स आणि कापड दुकानदार व्यापारी असोसिएशनचे वतीने ट्रॅकसूट वाटप

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – सुमारे पाच महिन्यांपासून श्रीगोंदा पोलिसांच्या मदतीला राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) आजी आणि माजी विद्यार्थी आहोरात्र काम करत असून श्रीगोंदा शहरातील गृन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यास मोठी मदत होत असल्याची दखल घेत श्रीगोंदा शहर मंडप, लाईट डेकोरेटर्स असोशिएशन, आणि कापड दुकानदार व्यापारी असोसिएशनचे वतीने आज गुरुवार (दि. २४) कर्जत उपविभाग पोलीस अधिकारी संजय सातव आणि श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या हस्ते श्रीगोंदा शहर पोलीस मित्रांचा ट्रॅकसूट देऊन सन्मान करण्यात आला. 

याविषयी सविस्तर वृत्त असे की, कोरोना व्हायरसला प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र  शासनाकडून जमावबंदी आणि संचारबंदी  लागू करण्यात आली. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कर्जत उपविभाग पोलीस अधिकारी संजय सातव आणि  श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) आजी आणि माजी विद्यार्थी सुमारे पाच महिन्यांपासून श्रीगोंदा पोलिसांच्या सोबतीला काम करत असून ग्रामसुरक्षा पोलीस मित्र बनून श्रीगोंदा शहरात रात्रीची गस्त घालत आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी होणाऱ्या अघटीत घटना, चोरी, दरोडा, अवैध प्रवासी वाहतूक याबरोबरच इतर गुन्हे उघड होण्यास मदत होत असल्याने पोलीस मित्रांचा यथोचित सन्मान व्हावा.

या हेतूने व्यापारी असोसिएशनचे सतीश पोखरणा, अमित बगाडे आणि श्रीगोंदा तालुका मंडप, लाईट डेकोरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सोपान डाके, उपाध्यक्ष योगेश मुथा, सचिव अनिरुद्ध पावसे यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांची भेट घेऊन पोलीस मित्रांसाठी ट्रॅकसूट, मास्क यांचे वाटप करण्याची ईच्छा व्यक्त केली.
त्यानुसार आज गुरुवार दि. २४ रोजी कर्जत उपविभाग पोलीस अधिकारी संजय सातव आणि श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या हस्ते श्रीगोंदा शहरातील पोलीस मित्रांचा ट्रॅकसूट आणि N९५ मास्क देऊन सन्मान केला.
यावेळी व्यापारी असोशिएशनचे सतीश पोखरणा, बगाडे रिटेलचे अमित बगाडे, व्यंकटेश वुलनचे अमित बगाडे तसेच अनुप कटारिया, अनिलशेठ गांधी, सागर बगाडे, हर्षद भंडारी, पांडुरंग पोटे, इम्रान इनामदार, तसेच श्रीगोंदा तालुका मंडप, लाईट डेकोरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सोपान डाके, उपाध्यक्ष योगेश मुथा, सचिव अनिरुद्ध पावसे, खजिनदार अंकुश घाडगे, कार्याध्यक्ष मारुती दहातोंडे तसेच सुनील मखरे, सागर हिरडे, सुखदेव होले, सचिन खेतमाळीस, बाळू गोंटे, मंजूर इनामदार, पोपट डाके इत्यादी सदस्य उपस्थित होते. गेल्या पाच महिन्यापासून व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक संकटातून जावे लागत असूनही पोलीस मित्रांसाठी सर्वप्रथम दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here