Sangamner : कोरोनाबाधित रुग्णसंख्या पोहोचली 2805 वर; आजची नवीन रुग्ण संख्या 40…

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

संगमनेरमध्ये कोरोना रुग्ण वाढण्याचे चक्र आजही सुरूच होते. आजही संगमनेरमध्ये नवीन 40 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. आज ही शहरात 05 तर ग्रामीण भागात 35 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर आज एकूण बाधित रुग्ण संख्या ही 28 वे शतक ओलांडून 2805 वर पोहचली आहे. तर मृतांची संख्या एकने वाढली आज एकूण मृत संख्या ही 35 वर पोहचली आहे.

आज सरकारी , खासगी प्रयोग शाळा व रॅपिड अँटीजेन चाचणीतून शहरातील 05 तर ग्रामीण भागातील 35 जणांचे अहवाल बाधित प्राप्त झाले आहे. त्यात शहरातील नेहरु चौक 26 वर्षीय तरुण, स्वामी समर्थनगर 33 वर्षीय तरुण, गणेशनगर 20 वर्षीय महिला, नवघर गल्लीत 35 वर्षीय तरुण व जनता नगर 40 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. तर तालुक्यातील आश्वी खुर्द 35 वर्षीय महिला, पेमरेवाडी 15 वर्षीय तरुणी, कोठे बुद्रुक  55 वर्षीय व्यक्ती, चिंचपूर 20 वर्षीय तरुण, हिवरगाव पठार 85 वर्षीय व्यक्ती, तळेगाव दिघे 72 ,50 वर्षीय महिला, 19 ,15 वर्षीय तरुण,46 वर्षीय व्यक्ती  वडगाव पान 48 वर्षीय महिला,

रायतेवाडी 55 वर्षीय व्यक्ती, 29 वर्षीय महिला, पेमगिरी 75, 57 वर्षीय महिला, संगमनेर खुर्द 70 वर्षीयव्यक्ती, सांगवी 60 वर्षीय महिला, लोहारे 73 वर्षीय व्यक्ती, घुलेवाडी 45, 40 वर्षीय व्यक्ती, 43 वर्षीय महिला, सावरगाव तळ  73 वर्षीय महिला , 70 वर्षीय व्यक्ती, मालदाड  54 वर्षीय व्यक्ती, धांदरफळ बुद्रुक 53 वर्षीय महिला, हिवरगाव पावसा 26 वर्षीय तरुण, राजापूर 60 वर्षीय व्यक्ती, 38 वर्षीय तरुण, गुंजाळवाडी 38, 37 वर्षीय महिला, निमगाव भोजापूर 40 वर्षीय व्यक्ती, 58, 38 वर्षीय महिला, कनोली 33 वर्षीय तरुण व निमगाव जाळी 57 वर्षीय व्यक्ती यांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here