Aurangabad : जोरदार पावसामुळे शेतातील उभी पिके झाली आडवी

प्रातिनिधिक छायाचित्र
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

गेल्या तीन ते चार दिवसापासून जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे सिल्लोड तालूक्यातील शिवना गावातील शेतक-यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. जोरदार पावसासह सुटलेल्या सोसाट्याच्या वा-यामुळे शेतातील उभी पिके आडवी झाली असल्याने शेतक-यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

यंदाच्या वर्षी पावसाळ्यात औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली असल्याने विहिरी, शेतातील तळे, सिंचन प्रकल्प आदी ओव्हर फ्लो होऊन वाहत आहेत. बुधवारी सायंकाळी जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसासह सुटलेल्या सोसाट्याच्या वा-याने सिल्लोड तालुक्यात धुमाकुळ घातला आहे. जोरदार वा-यामुळे शेतातील उभी मका आडवी पडली असून मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतक-यांना बसला असून शेतक-यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास जोरदार पावसाने हिसकावून घेतला असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

दरम्यान, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकNयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ज्या शेतकNयांनी पिक विमा घेतला होता, त्यांना लवकरात लवकर नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करून त्याचा अहवाल मिळाल्यास पिक विम्याचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here