Shrigonda : काष्टीत जायभाय कॉम्प्लेक्सला आग; ४० लाखाचे नुकसान

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील जायभाय कॉप्लेक्समधील दुकानाला आग लागून येथील राजस्थानी तुळसाराम गंगाराम चौधरी (३७) यांच्या तुलसी जनरल स्टोअर्स व तुलसी गिफ्ट हाऊस ही दोन्ही दुकाने लागलेल्या आगीत जळून खाक झाली आहेत. यामध्ये सुमारे ४० लाखाचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज असून ही आग नेमकी कशी लागली. हे, मात्र संशयास्पद असल्याने पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करीत आहे.

आज शुक्रवारी (दि.25) पहाटे दोनच्या सुमारास गावातील नगर-दौंड रोडवर नागवडे पेट्रोल पंपाच्या शेजारी जायभाय कॉप्लेक्स आहे. रात्रीच्या वेळी श्रीगोंदा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सतिष गावित हे सहकार्यासह रात्रीचे संपूर्ण गावात गस्त घालित असताना अचानक जायभाय कॉम्प्लेक्स जवळ धूर दिसला. त्यावेळी त्यांना वाटले कोणीतरी शेकोटी करुण शेकत आहे. परंतु जवळ जाऊन पाहिले तर येथील तुलसी जनरल स्टोअर्स या दुकानातून आगीचा धूर येताना दिसला. त्यावेळी वेळेचे गांभीर्य ओळखू गावित यांनी श्रीगोंदा नगर पालिकेच्या अग्नीशामक दलातील पथकाला माहिती देऊन बोलावून घेतले.
तोपर्यंत या कॉम्प्लेक्समधील सर्व दुकानदार व्यावसायिक लोकांना घटनेची माहिती दिली. अनेक जण रात्रीची वेळ असल्याने  फोन घेत नव्हते. तो पर्यंत इकडे आगीने उग्ररुप धारण केले होते. घटनास्थळी उपसरपंच सुनिल पाचपुते, उद्योजक सतिष कुतवळ, आदेश नागवडे, अनेक लोक दाखल झाले. यावेळी नागवडे साखर कारखान्यातील अग्नीशामक बंब बोलवून दोन्ही फायर ब्रिगेडच्या मदतीने रात्री दोन ते पहाटे सहा वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्यात यश आले.
आग लागली तेव्हा शेजारी नागवडे पेट्रोल पंप असल्यामुळे मोठा धोका होता. तसेच याच इमारतीमध्ये युनियन बॕक,महाराष्ट्र बॕक, श्रीराम पतसंस्था, हरिओम मशीनरी, भैरवनाथ शेती भांडार,सायन्स अकॅडमी क्लास, श्रीफोटो स्टुडिओ यासह अनेक व्यावसायिक दुकानासह बँकेचे दोन एटीम मशीन आहेत आग लवकर विझविल्याने पुढील अनर्थ जरी टळला असला तरी आगीची झळ मात्र सर्वांना पोहचली आहे.
मात्र, यामध्ये तुलसी जनरल स्टोअर्स व गिफ्ट हाऊस यांचे दोन्ही दुकानाचे सुमारे ४० लाखा पर्यंतचे मोठे नुकसान झाले आहे. आग नेमकी कशी लागली. हे मात्र संशयास्पद असून घटस्थळी आमदार बबनराव पाचपुते, जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते यांनी भेट देऊन पहाणी केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here