Karjat : कोरोना काळात पत्रकारांचे कार्य वाखण्याजोगे – आमदार रोहित पवार

1

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

कर्जत : कोरोना काळात पत्रकारांनी स्थानिक प्रशासनाबरोबर उत्तम कार्य पार पाडले आहे. ते कार्य निश्चित वाखणण्या जोगे आहे. अनेक सत्कार कार्यक्रम घडले पण आजचा पत्रकारांचा सत्कार कार्यक्रम वेगळा आहे. त्याचे योगदान या कोरोना काळात महत्वपूर्ण राहिले आहे, असे मत आमदार रोहित पवार यांनी केले.

ते पंचायत समिती कार्यालय आयोजित कोरोना योद्धे पत्रकार सन्मान प्रसंगी बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी अमोल गायकवाड, सभापती आश्विनी कानगुडे, उपसभापती हेमंत मोरे, माजी सभापती नानासाहेब निकत, सुनील शेलार आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना आमदार पवार म्हणाले की, समाजाचे खरे प्रतिबिंब मांडण्याचे काम पत्रकार निस्वार्थीपणे करीत आहे. त्यांचे कार्य फार मोलाचे असून त्यांनी या काळात वेळप्रसंगी स्वता:च्या जीवावर उदार होत कोव्हिड सेंटरच्या व्यथा आणि अडचणी प्रशासनासमोर मांडल्या. आज कर्जत पंचायत समितीने त्याची जाणीव ठेवत कोरोना योद्धे म्हणून पत्रकाराचा सन्मान केला निश्चित भूषणावह आहे. समाजात काम करताना पत्रकारांचे स्थान अत्यंत महत्वाचे असून त्यांचे योगदान समाजासाठी मार्गदर्शन ठरते, असे सांगत येणाऱ्या काळात पत्रकारांच्या प्रश्नावर काम करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी बोलताना गटविकास अधिकारी अमोल गायकवाड म्हणाले की, कोरोना काळात सर्वच स्थानिक पत्रकारांनी तालुका प्रशासनाबरोबर आपला जीव धोक्यात घालीत सर्वसामान्य नागरिकांना अपडेट देण्याचे काम केले. त्यामुळे त्यांचे सन्मान करने भाग आहे. आज त्यांचा सन्मान करण्याचे भाग्य पंचायत समिती पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना मिळाले. यावेळी विस्तार अधिकारी मुकुंद पाटील, अशोक चव्हाण, दीपक समुद्र यांच्यासह सर्व स्थानिक पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी रुपचंद जगताप यांनी केले. तर आभार कर्जत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मुन्ना पठाण यांनी मानले.
पत्रकार भवन उभारण्याचे काम करू – आमदार रोहित पवार

अनेक दिवसांपासून कर्जत पत्रकार भवन प्रश्न प्रलंबित असून त्यासाठी आपण जागा उपलब्ध करून द्यावी. त्यावर आपण स्वता वैयक्तिक लक्ष देत स्थानिक पत्रकारांसाठी चांगले आणि भव्य पत्रकार भवन उभारण्याचे काम करू. यासाठी दोन्ही संघटनानी एकत्र यावे आणि जागा लवकरात लवकर उपलब्ध करण्याचे प्रयत्न करावे. यासह पत्रकार विमा सुरक्षा कवच प्राधान्याने देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पत्रकार समाजाला मार्गदर्शक – सभापती आश्विनी कानगुडे
पत्रकार आपल्या बातमीद्वारे सामाजिक प्रश्न उपस्थित करीत त्याचे पाठपुराव्याद्वारे तो प्रश्न तडीस नेण्याचे काम करीत आहे. त्यांचे काम समाजासाठी कायम मार्गदर्शक ठरत असून आज त्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करने गरजेचे असल्याचे पंचायत समितीच्या सभापती आश्विनी कानगुडे यांनी आपल्या भाषणात म्हंटले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here