Rahuri : धनगर समाजाच्या वतीने “ढोल बजाव सरकार जगाव आंदोलन”

0
धनगर आरक्षणाची दखल राज्यसरकारने न घेतल्यास अहमदनगर जिल्ह्यातील तीनही मंत्र्याच्या घरावर मेंढ्याचा मोर्चा काढणार

– विजयराव  तमनर धनगर समाज आरक्षण  समन्वय समितीच्या वतीने राज्यसरकारला ईशारा

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

येत्या काही दिवसात राज्य सरकारने धनगर आरक्षणाचा अध्यादेश काढला नाही तर अहमदनगर जिल्ह्यातील धनगर  समजाच्या वतीने जिल्ह्यातील मंत्री. प्राजक्त तनपुरे, शंकरराव गडाख, व बाळासाहेब थोरात यांच्या घरावर मेंढराचा मोर्चा काढण्यात येईल व त्यांना आरक्षणाचा जाब विचारला जाईल, अशी माहिती या आंदोलनाचे प्रमुख धनगर समाजाचे नेते व यशवंत सेना जिल्हा प्रमुख विजयराव तमनर यांनी दिली.

आज राहुरी तहसिल कार्यालयावर धनगरीवेशा मध्ये काठी व घोंगडी धनगरीवेशात समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले. “येळ कोट- येळ कोट “जय मल्हार” ढोल बजाव सरकार जगाव”या घोषणांनी परिसर दूमदूमून गेला. या मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यासाठी राहुरीचे तहसीलदार शेख साहेब पी. आय. देशमूख साहेब उपस्थित होते. त्यांनी निवेदन स्वीकारुन वरिष्ठापर्यंत भावना कळवू असे, आश्वासन दिले.

त्यानंतर तहसिल कार्यालयावर धनगर समजाची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे धनगर समजाचा पहिला मोर्चा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या घरावर काढण्याचा ठराव पास करण्यात आला. सर्व उपस्थितांनी त्याला संमती दिली.

या आंदोलनाला यशवंत सेनेचे जिल्हाप्रमुख विजय तमनर व जिल्हा नियोजन समितीच्या वैशालीताई नान्नोर, अहिल्यादेवी प्रतिष्ठान चे ज्ञानदेव बाचकर पुण्यश्लोक मल्टीपर्पजचे चेअरमन दत्ताभाऊ खेडेकर,भारतभाऊ मतकर, दादाभाऊ तमनर,महेशराव तमनर,सखाराम तमनर,आप्पासाहेब तमनर,मुळाधरणग्रस्त संघटनेचे मारुतीदादा बाचकर,श्रीकांत बाचकर,कोंडीराम बाचकर,डिग्रसचे रभाजी गावडे,बाळासाहेब गावडे,दिलीप तमनर,निवृत्ती इर्लेसर,कैलास केसकर वसंत पाटोळे,आप्पा सरोदे,भागवत खेडेकर,गणेश गिरगूने,किशोर खिलारी,निलेश बाचकर,भारत बाचकर,सचिन बिडगर,
यशवंत सेनेचे रंगनाथ अण्णा तमनर,अतूलजी वडीतके,भागवत झडे,शरद बाचकर,सागर पारखे,गौरव भडांगे,बाबासाहेब केसकर,सुभाष गुलदगड,ढोलवादक बाबासाहेब तमनर,बिरोबा भक्त खाटेकर महाराज महिला संघर्ष समितीच्या वर्षाताई बाचकर गोपीचंद पडळकर सोशल मीडियाचे, दत्ताभाऊ बाचकर,राजुभाऊ वाघ,पत्रकार रोहिदास दातीर, गणेश विरकर , संपत बलमे, रामदास बाचकर, धनगर समाज युवा मल्हार सेना राहुरी तालुका अध्यक्ष हरिभाऊ चोरमले पोपट बाचकर, सुनिल बाचकर,गणेश तमनर आदि. समाज बांधव उपस्थित होते. हे आंदोलन सोशल डिस्टंस पाळून करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here