Beed : नाट्यशास्त्र प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू 

1
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

बीड – येथील केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात नाट्यशास्त्र विभागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित नाट्यशास्त्र पदविका आणि प्रमाणपत्र कोर्ससाठी प्रवेश देणे सुरू झाले असल्याचे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर यांनी कळविले आहे.

१२ वी नंतर असणाऱ्या या कोर्ससाठी वयाचे बंधन नाही. कोणत्याही क्षेत्रात शिक्षण घेत असणाऱ्या किंवा व्यवसाय, नौकरी करणाऱ्या रसिक, कलावंत या कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकतात. नाट्य – इतिहास, अभिनय, रंगतंञ, दिग्दर्शन, नाट्यव्यवस्थापन, नाट्यलेखन, नाट्यसमीक्षा आदी विषयांवर शास्ञशुद्ध शिक्षण या कोर्समध्ये दिले जाते. तरी आवड असणाऱ्या विद्यार्थी, कलावंत, रसिकांनी या कोर्ससाठी प्रवेश घेण्याचे आवाहन प्राचार्य डॉ.दीपा क्षीरसागर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी नाट्यशास्त्र विभाग प्रमूख डॉ. संजय पाटील देवळाणकर, प्रा. दुष्यंता रामटेके यांच्याशी संपर्क साधावा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here