Shrigonda : ‘ओव्हर फ्लो’च्या पाण्याने शेततळी साठवण बंधारे भरून घ्या – आमदार पाचपुते 

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कुकडीच्या व विसापूरच्या ‘ओव्हर फ्लो’च्या पाण्यातून साठवण बंधारे व शेततळी शेतकऱ्यांनी भरून घ्यावीत, असे आवाहन आमदार बबनराव पाचपुते यांनी केले आहे.

कुकडी धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे कुकडीचे धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. त्यामुळे हे पाणी नदीत सोडण्यात आले आहे. काही पाणी विसापूर धरणात सोडल्यामुळे विसापूर तलावही ओव्हर फ्लो झाले आहे. त्यामुळे विसापूर खालील शेतकऱ्यांनी साठवण बंधारे व शेततळी भरून घ्यावीत तसेच विसापूरमधील ‘ओव्हर फ्लो’चे पाणी कुकडी जुन्या १३२ लिंक कॅनालमधून घेऊन त्या खालील ही सर्व छोटे मोठे साठवण बंधारे व शेततळी शेतक-यांनी भरून घ्यावेत, असे आवाहन आमदार पाचपुते यांनी केले आहे.
या पाण्याचा भविष्यात उपयोग होईल – आमदार पाचपुते
सध्या धरणे भरून नदीत पाणी चालू आहे पण याच पाण्यातून जर कॅनॉल द्वारे शेततळी साठवण बंधारे भरून घेतले तर भविष्यात या पाण्याचा शेतकऱ्यांना नक्कीच उपयोग होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कुकडीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पाणी घ्यावे असेही आमदार बबनराव पाचपुते म्हणाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here