Aurangabad : क्षुल्लक कारणावरून डॉक्टरला फायटरने मारहाण

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कारला धडक का दिली, असे विचारणा-या डॉक्टरला तीन जणांनी शिवीगाळ करत फायटरने मारहाण केली. डॉ. संतोष रतन काळूसे (वय ३०, रा.संघर्षनगर, सिडको एन-२) असे मारहाणीत जखमी झालेल्या डॉक्टराचे नाव आहे.

डॉ. संतोष काळूसे हे भूलतज्ज्ञ असून ते मोंढा नाका पुलाजवळील गौर रुग्णालय येथे कार्यरत आहेत. २३ सप्टेंबर रात्री आठ वाजताच्या सुमारास डॉ. काळूसे हे आपल्या कार क्रमांक (एमएच-२०-एफजी-४५७१) ने आपल्या घराकडे जात होते. मुकुंदवाडी सिग्नलजवळ ते थांबले असता, त्यावेळी पाठीमागून आलेल्या लाल रंगाच्या कारने डॉ. काळूसे यांच्या कारला धडक दिली.

त्यावेळी डॉ. काळूसे हे आपली कार रस्त्याच्या बाजूला घेऊन कारची पाहणी करीत असताना छोटू भारसाखळे, शिंदे व सोबतच्या आणखी एका इसमाने डॉ. काळूसे यांना शिवीगाळ करून फायटरने मारहाण केली. याप्रकरणी डॉ. काळूसे यांच्या तक्रारीवरून शिवीगाळ करून मारहाण करणा-या तिघांविरूद्ध एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जमादार बावस्कर करीत आहेत.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here