Newasa : अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी प्रशांत गडाख यांच्या प्रयत्नाने तालुक्यात 2 केंद्र

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

विद्यार्थ्यांची गैरसोय होणार दूर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यासाठी तालुकास्तरावर एक केंद्र महाविद्यालयास देण्यात आले आहे. यात सर्व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. परंतु नेवासा तालुक्यातील विद्यार्थ्यांची संख्या पाहता या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ टाळण्यासाठी प्रशांत गडाख अध्यक्ष मुळा एज्युकेशन सोसायटी सोनई यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथे परीक्षा नियंत्रक यांच्याशी संपर्क साधला. नेवासा तालुक्यात मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनई व ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा या दोन केंद्रांना मंजुरी मिळवली आहे.
त्यामुळे नेवासा तालुक्यातील अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या सर्वच विभागाच्या विद्यार्थ्यांना आपल्या घरापासून जवळच अंतिम वर्षाची परीक्षा कोरोनाची काळजी घेत देता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व पालक वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. प्रशांत गडाख यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत नेवासा तालुक्यात 2 परीक्षा केंद्र मंजूर करून आणल्याबद्दल विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले आहे.

105 COMMENTS

 1. Have you ever considered about adding a little bit more than just your articles?
  I mean, what you say is fundamental and everything.
  Nevertheless think of if you added some great graphics
  or video clips to give your posts more, “pop”!
  Your content is excellent but with pics and video clips, this blog could
  undeniably be one of the very best in its field. Fantastic blog! http://hydroxychloroquined.online/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here