Aurangabad : सिडको व कोकणवाडी भागातील ‘सेक्स रॅकेट’वर कारवाईची पोलिस आयुक्तांकडे मागणी

0

औरंगाबादमधील स्पा-मसाज पार्लरचा पीडित तरुणीकडून पर्दाफाश

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शहरातील सिडको व कोकणवाडी परिसरात सुरू असलेल्या स्पा- मसाज पार्लरमध्ये तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांना वाम मार्गाला लावण्याचा गोरख धंदा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परराज्यातून तरूणींना शहरात आणून त्यांच्याकडून देहव्यापार करून घेतला जात आहे. शहरातील एका स्पा मसाज पार्लरमधील त्रासाला कंटाळलेल्या एका तरूणीने पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांच्याकडे धाव घेत कारवाई करण्याची मागणी केली आहे. मागील तीन वर्षांपासून हा ‘सेक्स’चा गोरख धंदा सुरू असून अनेक उच्चभ्रू नागरिकांचा ग्राहकांमध्ये समावेश असल्याचे समोर आले आहे.

पीडित तरुणीने म्हटल्याप्रमाणे स्पा चालक रिजू जोश आणि हर्षल यांनी तिला दोन वर्षांपूर्वी नोकरीचे आमीष दाखवत शहरात आणले. त्यानंतर कोकणवाडी भागातील एका स्पा-मसाज पार्लरमध्ये नोकरी दिली. काही दिवसांनी तिथे येणार्‍या ग्राहकांसोबत तिला अश्लील काम करण्यास भाग पाडण्यात आले. तेव्हा तिने नकार दिला. मात्र, तिला धमकावून तिच्याकडून अश्लील चाळे करावयास लावले. तिथे येणार्‍या उच्चभ्रू ग्राहकांना अर्ध नग्नावस्थेतील तरुणीकडून मसाज करून दिला जातो, त्यानंतर शरीर संबंध प्रस्थापित करण्यासाठी ३ ते ५ हजार रुपये ग्राहकांकडून स्पा चालक घेतो. हे सर्व कारनामे एका गुप्त खोलीत चालवले जातात, असे पीडित तरुणीने पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या सोबतच पीडित तरुणीने म्हटल्याप्रमाणे या स्पा-मसाज पार्लरमध्ये मुंबई, पुणे, नाशिक यासह अन्य राज्यातील नागालॅन्ड येथून तरुणींना वाम मार्गाला लावण्यासाठी आणले जात आहे. पीडितेने असे अश्लील काम करण्यास विरोध केल्याने तिला नऊ महिन्यांचा पगार दिला नाही. कुणाला काही सांगितले तर जीवे मारू अशी धमकी देऊन तिला कामावरून काढून टाकले. सध्या या पीडितेकडे पैसे नसल्याने तिच्या गावाकडे जाता येत नाहीये. घराचे भाडे देण्यासही पैसे नसल्याने ती अडचणीत सापडली आहे, असे तिने निवेदनात म्हटले आहे. अखेर वैतागून पोलीस आयुक्तांकडे मदतीसाठी धाव घेत तक्रार अर्ज दिला आहे.

वेदांतनगर पोलिसांकडून बेदखल
पीडित तरूणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात स्पा मसाज पार्लरमध्ये घडलेल्या अत्याचाराची तक्रार देण्यासाठी गेली होती. परंतु तेथील कर्मचार्‍यांनी तिची तक्रार नोंदवून न घेतल्याने तिने पोलिस आयुक्तालय गाठून तक्रार दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here