Rahuri : एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यासह चौघे कोरोना बाधित

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राहुरी पोलिस ठाण्यात एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह चारजण दोन दिवसात कोरोना बाधित आढळले. आता, पोलिस ठाण्यातील १२ कर्मचारी कोरोना बाधित झाल्याने उपचार घेत आहेत. सर्व अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांच्या कोरोना तपासणीची गरज आहे.

राहुरीच्या कारागृहातील 37 कैदी कोरोनाबाधित आढळले. त्यापाठोपाठ आठ- दहा दिवसात कारागृहाच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिस कर्मचारी आजारी पडू लागले. चार दिवसांपूर्वी पोलिस कर्मचारी कोरोना बाधित आढळले. मागील दोन दिवसात आणखी चार जण कोरोनाबाधित आढळले. त्यात, एक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा समावेश आहे. सध्या बारा जण दवाखान्यात उपचार घेत आहेत. राहुल पोलिस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कोरोना तपासण्या होणे गरजेचे आहे. अन्यथा, एखाद्या कर्मचार्‍याच्या जीवावर बेतण्याची शक्यता असल्याचे पोलिसमध्ये बोलले जात आहे.

कोरोना तपासणी केली. तर, कैद्यां पाठोपाठ पोलिसांमध्ये कोरोना बाधित संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वरिष्ठांची नाराजी ओढावेल. या भीतीने पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. जीव धोक्यात घालून अहोरात्र सेवा देऊनही, वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जीवाची काळजी करीत नाहीत, अशी चर्चा पोलिसांमध्ये केली जात आहे.

4 COMMENTS

  1. What i don’t understood is in truth how you are no longer actually a lot more neatly-preferred than you may be now. You’re so intelligent. You already know therefore significantly in terms of this matter, made me personally imagine it from so many various angles. Its like men and women aren’t involved unless it’s something to accomplish with Woman gaga! Your own stuffs excellent. Always handle it up!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here