Sangamner : कोरोना बाधित रुग्णांची संख्या तीन हजारांच्या उंबरठ्यावर

एकूण बाधित संख्या 2956 तर आजची नवीन बाधित संख्या 72; मृतांची संख्या 36

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री | विकास वाव्हळ

संगमनेरमध्ये कोरोना रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे. आज नवीन 72 रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला असून एकूण बाधित रुग्ण संख्या ही 30 व्या शतकाच्या अगदी जवळ म्हणजेच 2956 वर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे काळजीचे वातावरण पसरले आहे. प्रशासन काळजी घेत असले तरी नागरिकांनी देखील काळजी घेणे गरजेचे झाले आहे. अन्यथा ही रुग्ण संख्या सातत्याने वाढत राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.

आज खाजगी, सरकारी प्रयोगशाळा व रॅपिड अँटीजेन चाचणीतून 72 नवीन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. त्यात शहरातील 11 तर ग्रामीण भागातील 61 रुग्णांचा समावेश आहे. सध्या शहरी भागातील रुग्ण संख्या कमी असून ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत.

आज शहरातील स्वातंत्र्य चौक 71 वर्षीय महिला, मोतीनगर 33 वर्षीय तरुण, 07 वर्षीय बालक, चैतन्य नगर 73 वर्षीय व्यक्ती, नवीन नगर रोड 18 वर्षीय तरुण, मालदाड रोड 66, 28 वर्षीय महिला,55 वर्षीय व्यक्ती, घोडेकर मळा, 24 वर्षीय तरुण, जनतानगर 33 वर्षीय तरुण, वडजे मळा 45 वर्षीय महिला अश्या 11 जणांचा अहवाल प्राप्त झाले आहे.

ग्रामीण भागातील उर्वरित 61 रुग्णांचा अहवाल पुढील प्रमाणे त्यात बेट सांगवी 78 वर्षीय व्यक्ती, खंडेरायवाडी 58 वर्षीय व्यक्ती, पिंपरणे 25 वर्षीय तरुण, हंगेवाडी 54, 45, 24, 18 वर्षीय महिला, 26 व 23 वर्षीय तरुण, कोठे बुद्रुक 85 वर्षीय व्यक्ती, 56 वर्षीय महिला, सावरगाव घुले 70, 30,16 वर्षीय महिला, 38 वर्षीय तरुण,12 वर्षीय बालक, कर्‍हे 19 वर्षीय तरुण, प्रतापपूर 41, 41,15, 22 वर्षीय महिला 17 वर्षीय तरुण, रहिमपूर 37 वर्षीय महिला, चिंचपूर 62 वर्षीय व्यक्ती, 35 वर्षीय तरुण, 60, 27, 20 वर्षीय महिला, कोकणगाव 63 वर्षीय व्यक्ती, 17 वर्षीय तरुणी, 13 वर्षीय बालक, कोंची 55 वर्षीय व्यक्ती, देवकौठे 31 वर्षीय महिला, तळेगाव दिघे 60 वर्षीय व्यक्ती,संगमनेर खुर्द 39 वर्षीय तरुण, वडगाव 55 वर्षीय व्यक्ती, घुलेवाडी 52, 47 व्यक्ती, 28,15 वर्षीय तरुण, 10 वर्षीय बालक, 60, 47, 41 वर्षीय महिला,

राजापूर 59 वर्षीय व्यक्ती,30 वर्षीय तरुण, 50 वर्षीय महिला, कणकापूर 42 वर्षीय महिला, नांदुरी दुमाला 35 वर्षीय महिला, वाघापूर 35 वर्षीय तरुण, मिर्झापूर 48 वर्षीय व्यक्ती, 18 वर्षीय तरुण, जवळे कडलग 10 वर्षीय बालिका, निमागाव भोजापूर 48 वर्षीय व्यक्ती, 40 वर्षीय महिला, आंबी दुमाला 38 वर्षीय तरुण, अकलापूर 60 वर्षीय व्यक्ती, 54 वर्षीय महिला, माळवाडी 28 वर्षीय तरुण, मुंजेवाडी 26 वर्षीय तरुण यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज नवीन रुग्णसंख्येत 72 रुग्णांची भर पडल्याने 29 वे शतक ओलांडून 30व्या शतका कडे धाव घेतली आहे आज 2956 वर रुग्ण संख्या पोहचली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here