Beed : लॉकडाऊनमुळे अनेक उमेदवार नोकरीपासून वंचित, वयोमर्यादा वाढवा – जयदत्त क्षीरसागर

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

संपूर्ण देशभरात गेल्या सहा महिन्यापासून कोरोना प्रादुर्भावामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. अनेक उमेदवारांना नोकरीसाठी लागणारी वयोमर्यादा केवळ थोड्या दिवसांसाठी संपू लागल्यामुळे नोकरीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नोकरीसाठी एक वर्ष वयोमर्यादा वाढवावी, अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या सहा महिन्यापासून सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेक उमेदवारांना केवळ वयोमर्यादेमुळे नोकरीपासून वंचित राहण्याची वेळ देखील आली आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांना एक वर्ष वयोमर्यादा वाढवून दिल्यास त्यांना नोकरीची संधी मिळेल. यासाठी प्रत्येक घटकांना एक वर्षाची वयोमर्यादा वाढवून देण्यात यावी.
शासकीय पदभरती वर निर्बंध आले असले तरी भरती प्रक्रियेत सामील होण्यासाठी एक वर्षाची वयोमर्यादा वाढवणे गरजेचे आहे. सध्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादा 38 तर मागासवर्गियांसाठी 43 वर्षे आहे. ही वयोमर्यादा संपल्यामुळे अनेक उमेदवार नोकरीपासून वंचित राहणार आहेत. याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून राज्य शासनाने अशा उमेदवारांना एक वर्षांची वयोमर्यादा वाढवून द्यावी, अशी मागणी क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here