सरकारकडे 80 हजार कोटी आहे का असा प्रश्न अदर पुनावाला यांनी पीएमओ कार्यालयाला विचारलाय

वाचा पुनावाला यांनी का उपस्थित केला प्रश्न

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालय व अदर पुनावाला यांनी पीएमओ कार्यालयाला सरकारकडे 80 हजार कोटी आहे का असा प्रश्न विचारला आहे. कारण कोरोना लस देशात सर्वांपर्यंत पोहोचवायची असेल तर इतका खर्च लागणार आहे. सिरम इन्स्टिट्यूटने करोनावरील लशीचे उत्पादन आणि वितरणासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेकासोबत करार केला आहे.

पुढच्या वर्षभरासाठी केंद्र सरकारकडे 80 हजार कोटी रुपये आहेत का? कारण लस विकत घेऊन, ती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी इतका खर्च येणार आहे. आता आपल्याला या आव्हानाचा सामना करायचा आहे असे अदर पूनावाला यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. आपल्या टि्वटमध्ये त्यांनी आरोग्य मंत्रालय आणि पीएमओ इंडियला टॅग केलं आहे.

पुढे ट्विटमध्ये पुनावाला यांनी असेही म्हटले आहे की मी हे फक्त यासाठी विचारले आहे कारण आम्हाला सर्वांपर्यंत ही लस पोहोचवण्यासाठी योजना आखावी लागेल. आपल्या देशाची गरज लक्षात घेता, लशीची खरेदी आणि वितरणासंदर्भात देशातील व परदेशातील लस उत्पादकांना मार्गदर्शन करावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here