Bollywood Drugs Case : मी फक्त चॅट केलं मात्र ड्रग्ज घेतलं नाही, दीपिकाची कबुली

एनसीबीकडून दीपिकाची पाच तास चौकशी
दीपिकाच्या कारचीच जास्त चर्चा

मी ड्रग्ज संदर्भात फक्त चॅट केले मात्र ड्रग्ज घेतले नाही, अशी कबुली अभिनेत्री दीपिका पादुकोन हिने चौकशी दरम्यान दिली आहे. एनसीबीकडून आज दीपिकाची तब्बल साडेपाच तास चौकशी करण्यात आली. मात्र, चौकशी दरम्यान दीपिकाकडून समाधानकारक उत्तर मिळाली नसल्याची माहिती सुत्रांकडून समजत आहे.

एनसीबीकडून समन्स आल्यानंतर आज दीपिका पादुकोण निर्धारित वेळेआधी दहा मिनिटं एनसीबी कार्यालयात पोहोचली. दीपिकाची तब्बल साडेपाच तास चौकशी करण्यात आली. दीपिकानं ड्रग्ज चॅटसंदर्भात कबुली दिली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र आपण ड्रग्जचं सेवन केलं नसल्याचं तिनं सांगितलं असल्याचीही माहिती आहे. दीपिकाकडून काही प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्याची देखील माहिती आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here