Beed : कोरोनामुळे डॉक्टरचा मृत्यू झाल्यास त्यांना शहीद दर्जा देण्यात यावा – डॉ. राजेंद्र बंड

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
कोरोनामुळे डॉक्टरचा मृत्यू झाल्यास त्यांना शहीद दर्जा देण्यात यावा, अशी मागणी होमोओपॅथिक डॉक्टर संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष डॉ. राजेंद्र बंड यांनी केली आहे. याबाबत नुकतेच बीड जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, या कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण जग परेशान आहे व त्याच्या प्रादुर्भावामुळे सामान्य माणूस ते मंत्री पर्यंत सर्वांना त्रास झालेला आहे. covid 19 च्या लागण मुळे सामान्य माणूस ते मोठे अधिकारी व मंत्री सुधा मृत्यू झाल्याचे चित्र दिसत आहे व त्याचा परिणाम सर्वात जास्त वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणा-या डॉक्टर मंडळीवर झालेला आहे आणि किती तरी शासकीय व खाजगी वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देणारे डॉक्टरचा मृत्यू झालेला आहे.

रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून काम करणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत. त्यांचे खूप हाल होतात. त्यामुळे अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता व रुग्णांना सेवा उपलब्ध करून देणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू झाल्यास त्यांना

1)शहीदचा दर्जा देण्यात यावा.

2)कुटुंबातील पाल्याना वैद्यकीय शिक्षण साठी प्रवेश देऊन त्यांचे पूर्ण शिक्षण मोफत करावे.
3) मृत्यू झाल्यास तात्काळ मदत म्हणून 50 लक्ष रुपये रोख रक्कम देण्यात यावी.
4) कुटुंबातील एका सद्स्य ला शासकीय सेवेत रुजू करून घावे.

अशी मागणी होमिओपॅथिक डॉक्टर संघटनाचे आदक्ष डॉ. राजेंद्र बंड, उपाध्यक्ष राजेंद्र गुंजे, डॉ. अभिराज राजपुरे, डॉ. संजय खरसाडे, डॉ. जितीन दादा वजारे खलापुरीकर आदींनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here