Belgaon: सुधारित भू कायद्याविरोधात सोमवारी बेळगावसह कर्नाटक बंदची हाक

गिरिष कल्लेद। राष्ट्र सह्याद्री

बेळगाव : केंद्र सरकारच्या सुधारित भू कायद्याच्या विरोधात सोमवार दिनांक 28 रोजी कर्नाटकसह बेळगाव बंदची हाक देण्यात आली आहे. सुधारित भू कायदा तसेच एपीएमसी दुरुस्ती कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असून हा कायदा शेतकरीविरोधी व अन्यायकारक आहे. केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ तसेच सुधारित कायदा रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी बंदची हाक देण्यात आली आहे.

आंदोलनकांच्या वतीने जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटना तसेच दलित व अन्य संघटनांच्या माध्यमातून बेळगाव येथील सुवर्ण सौधवर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी सुवर्ण सौधला घेराव घालण्यात येणार आहे. दरम्यान कर्नाटक बंदला राज्य काँग्रेस व निधर्मी जनता दल या पक्षाने आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. सोमवारी होणाऱ्या बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा पोलिस विभागाने आवश्यक ती पूर्ण खबरदारी घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here