Shevgaon : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गोळेगाव व शेकटे बु. गावठाणसाठी सार्वजनिक शौचालय मंजूर

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत जिल्हा परिषदकडून शेवगाव तालुक्यातील गोळेगाव व शेकटे बु. गावठाण येथे प्रत्येकी दहा सिटचे एक सार्वजनिक शौचालय युनिट मंजूर केले आहे, अशी माहिती लाडजळगाव गटाच्या जि.प. सदस्या हर्षदा  काकडे यांनी दिली.
यावेळी काकडे म्हणाल्या की, गोळेगाव व शेकटे बु. येथे सार्वजनिक शौचालय नव्हते. ग्रामस्थांची याप्रश्नी अनेक दिवसांची मागणी होती. यासाठी जिल्हा परिषद अहमदनगरकडून जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत त्यांना प्रत्येकी दहा सिटचे एक सार्वजनिक शौचालय मंजूर केले असून त्यासाठी प्रत्येकी एक लाख ऐंशी हजार एवढा भरीव निधी गोळेगाव व शेकटे बु या गावांना मंजूर झाला आहे.
गावात सार्वजनिक शौचालय झाल्यानंतर गावातील रस्त्यावर शौचालयास बसण्यास आता आळा बसणार आहे. गावातील सार्वजनिक स्वच्छतेत यामुळे मोठी भर पडेल. त्यामुळे सदरचे शौचालयाचे काम ग्रामपंचायतीने चांगल्या दर्जाचे करून घ्यावे असेही काकडे यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here