Shevgaon : जोहरापूर ग्रामस्थांची पाण्यासाठी भर पावसाळ्यात भटकंती, गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं म्हणण्याची गावक-यांवर वेळ!

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
शेवगाव नगर परिषदेच्या अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या जोहरापूर गावामध्ये कोरोना महामारीमध्ये एकीकडे शासन सोशल डिस्टन्स यांचे पालन करण्याचे आवाहन करीत असतानाच नागरिकांना पिण्यासाठी पाणी जीवनावश्यक बाब असल्याने ग्रामपंचायत जोहरापूर गावामध्ये गेल्या एक महिन्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी गावातील महिला व ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी शेजारील वस्ती वाड्यावर व काही ठिकाणी शहर टाकळी व 24 गाव योजनेच्या वालवर पाणी भरण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
संपूर्ण गाव एकाच ठिकाणी पाणी भरण्यासाठी येत असल्यामुळे गावावर कोरोनाचे मोठे संकट ओढवण्याची शक्यता आहे. तरी प्रशासनाने तातडीने यावर लक्ष केंद्रित करावे व पाण्याचा प्रश्न सोडवावा अंन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मोठे जनआंदोलन उभे करण्यात येणार आहे, अशी माहिती अहमदनगर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे ग्रामपंचायत सदस्य रवींद्र उगलमुगले यांनी म्हटले आहे.

शेवगाव तालुक्याची उपराजधानी समजले जाणारे जोहरापूर हे गाव जायकवाडीच्या बॅक वॉटर क्षेत्राने तिन्ही बांजूनी वेढलेले आहे. गावाच्या पश्चिम भागामध्ये मुळा धरणाचे पाणी येत असते. असं सर्व बाजूंनी पाण्याचे स्रोत उपलब्ध असूनही गावकऱ्यांवर मात्र पिण्याच्या पाण्यासाठी भर पावसाळ्यात भटकंती करण्याची वेळ आली आहे. एकीकडे तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाने हाहाकार माजलेला असताना मात्र प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे व ग्रामसेवकांच्या मनमानी पणामुळे गावक-यांवर ही वेळ ओढवलेली असल्याचे ग्रामपंचायत सदस्य रवींद्र उगलमुगले यांनी म्हटले आहे.

अनेक वेळा विनंत्या अर्ज करूनही गेल्या अडीच वर्षांपासून सरकारी विहिरीची डागडुजी करावी यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले गेले असतानाही मनमानी पणे कारभार चालविणाऱ्या सरपंच व ग्रामसेवक यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही वेळ ओढवलेली आहे, असे स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांनी म्हटले आहे. यामुळे गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
भाजप-सेना युतीचे महाराष्ट्र राज्यावर शासन असताना पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे ही याबाबत पाठपुरावा केला गेला होता,परंतु स्थानिक ग्रामपंचायती ने कोणत्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने विहिरीच्या डागडुजीकडे दुर्लक्ष केले आहे
पाणीपुरवठा योजनेसाठी असलेली ग्रामपंचायत मालकीची इंधन विहीर ही ढोरा नदीच्या किनारी असल्याने पुराच्या पाण्याने खचली आहे. ज्यावेळी विहिरीसाठी एक सिमेंट गोणी खर्च करावयाची होती. आज तिथे सोळा लाख रुपये खर्च शेवगाव पंचायत समितीचे अभियंता दाखवत आहेत. हे सर्व सरपंच व ग्रामसेवक यांच्या दुर्लक्षामुळे झाल्याचे गावकर्‍यांचे म्हणणे आहे.
याबाबत अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत तातडीने लक्ष घालण्याचे आश्वासन देऊन गटविकास अधिकारी महेश डोके यांच्याशी चर्चा करून तत्काळ पाण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here