Aurangabad : लग्नाचे आमिष दाखवून तरूणीचे लैंगिक शोषण

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

औरंगाबाद – महाविद्यालयात शिक्षण घेत असताना झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाल्यानंतर एका तरुणाने १७ वर्षीय तरूणीचे लैंगिक शोषण केले. अक्षय ज्ञानेश्वर इंगळे (वय २०, रा.आंबेडकरनगर), असे तरूणीचे लैंगिक शोषण करणा-या आरोपीचे नाव आहे. 

पीडित तरूणी व अक्षय इंगळे हे दोघे फुलंब्री तालुक्यातील एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. त्यावेळी पीडित तरूणीसोबत अक्षय इंगळेची ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमसंबधात झाल्यानंतर अक्षय इंगळे याने नोव्हेंबर २०१९ ते फेब्रवारी २०२० या काळात विविध ठिकाणी नेऊन तिला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केले.

पीडितेने लग्नासाठी तकादा लावल्यावर अक्षय इंगळे याने लग्न करण्यास नकार देत. तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. पीडित तरूणीच्या तक्रारीवरून अक्षय इंगळे याच्याविरूध्द सिडको पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक अश्लेषा पाटील करीत आहेत.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here