गँगस्टरला मुंबईहून यूपीला घेऊन जात असताना कार उलटली, आरोपीचा मृत्यू

लखनऊ: फरार गँगस्टरला मुंबईत पकडल्यानंतर त्याला उत्तर प्रदेशला घेऊन जात असताना, रविवारी दुपारी पोलिसांच्या कारला मध्य प्रदेशात अपघात झाला. या अपघातात आरोपी फिरोजचा मृत्यू झाला. तर कारमधील पोलीस जखमी झाले.

लखनऊतील ठाकूरगंज पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचारी आरोपीला पकडण्यासाठी मुंबईत गेले होते. बहराईचचा रहिवासी फिरोज याच्याविरोधात ठाकूरगंज पोलीस ठाण्यात २०१४ मध्ये गुन्हा दाखल होता. तेव्हापासून फिरोज फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. सर्व्हिलान्सच्या मदतीने काही दिवसांपूर्वी फिरोज मुंबईत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक जगदीश प्रसाद पांडेय, कॉन्स्टेबल संजीव सिंह हे आरोपीचा नातेवाईक अफजलला घेऊन मुंबईत गेले होते. फिरोजला नालासोपाराच्या झोपडपट्टी परिसरातून अटक केली. अटकेनंतर पोलिसांचे पथक शनिवारी रात्री लखनऊला रवाना झाले. रविवारी सकाळी मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातील चांचौडा पोलीस ठाण्यात पाखरिया पुरा टॉलजवळ पोलिसांची कार उलटली. या अपघातात

गँगस्टर फिरोजचा मृत्यू झाला.

फिरोजचा नातेवाइक अफजलचा हात मोडला आहे. तसेच पोलीस कर्मचारी संजीव, जगदीश प्रसाद आणि वाहनचालक सुलभ मिश्रा हा देखील जखमी झाला. रस्त्यावर अचानक गाय आली. तिला वाचवताना कार उलटली. तर चालकाला डुलकी लागल्यामुळे अपघात झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. गुना पोलीस या घटनेची चौकशी करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here