ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल न मिळाल्याने विद्यार्थिंनीने केला जीवनाचा शेवट….

सातारा – कोरोनामुळे जुनपासून यंदाचे शालेय वर्ष हे ऑनलाईन पध्दतीने सुरू करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्यामुळे विद्यार्थिंनीने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. ही घटना कराड तालुक्यातील औंड येथे घडली. विद्यार्थिंनीला दहावीच्या अभ्यास सरावासाठी मोबाईल नसल्यामुळे तिला नैराश्य आले होते. घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे तिला मोबाईल मिळू शकत नाही आणि याच नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. सदर घटनेमुळे सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here