हाथरस प्रकरणातील आरोपींना अटक करून फासावर लटकवले पाहिजे: संजय राऊत

मुंबई: बलात्कार आणि खून महिलांच्या संदर्भात यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेली आहे. उत्तर प्रदेशातील हाथरसची घटना आणि त्या अगोदरही उत्तर प्रदेश मध्ये अशीच एक घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपींना अटक करून फासावर लटकवले पाहिजे. अशा घटना वारंवार का घडतात किंवा घडवल्या जातात यावर संशोधनाचे वारंवार चर्चा झाली पाहिजे. मला असं वाटतं की, आजही देशा मध्ये कायद्याची भीती राहिलेली नाही, महिला सुरक्षित नाही. ज्या वेळेला निर्भयाचा प्रकरण झालं त्या वेळेला आम्ही सर्व राजकीय नेते एकत्र होतो आम्ही पार्लमेंट चालू दिली नव्हती. आम्ही सर्व रस्त्यावर उतरलो होतो निर्भयाच्या न्यायासाठी हीच भूमिका आज केंद्रीय महिला मंत्र्यांनी घेणे गरजेचे आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here