क्रिकेट बेटिंग पडली महागात,पोलिसांनी टाकलेल्या धाडीत मुद्देमाला सह चार जण अटकेत..

प्रतिनिधी:गिरीश कल्लेद,बेळगाव

सध्या आयपीएल ची धूम सुरू असून सर्वत्र क्रिकेटचे वारे वाहू लागले ,बेळगावआहेत तर क्रिकेट बेटिंग धंदाही जोरात सुरू आहे. क्रिकेट बेटिंग प्रकरणी मंगळवारी उशिरा रात्री बेळगावच्या चार तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. खडेबाजार पोलीस स्थानक आवारातील चार जणांना याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये शकील शहापूर वाले, समीर मुल्ला , मुजावर चांद वाले आणि उत्सव जाधव या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या जवळून रोख 15 हजार 700 रुपये आणि चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. तर अन्य एका प्रकरणात शहापूर पोलिसांनी मटका प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळ सुमारे 12 हजार रुपये जप्त केले आहेत ,
नवीन बुचडी, महिन शकील व सरफराज शेख अशी मटका बुकिंग ची नावे आहेत.
पोलिसांनी केलेल्या या कारवाई नंतर छुप्या मार्गाने सुरू असनारा हा बेटिंग चा गोरख धंदा थांबेल का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here