Corona Effect: सौंदत्ती येथील श्री रेणुकादेवी आणि चिंचली येथील श्री मायाक्का देवी देवस्थान ‘या’ तारखेपर्यंत बंदच!

बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची माहिती

बेळगाव: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील श्री रेणुकादेवी आणि चिंचली येथील श्री मायाक्का देवी देवस्थान दि. 31 ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी गुरुवारी दिली.

मायाक्का देवी देवस्थान

कोरोना साथीमुळे ही देवस्थाने सुमारे सहा महिन्यापासून बंद ठेवण्यात आली आहेत. संपूर्ण कर्नाटकसह महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गोवा, तमिळनाडू आदी भागातील लाखो भाविकांचे सौंदत्ती श्री रेणुकादेवी आणि चिंचली श्री मायाक्का देवी ही श्रद्धास्थाने आहेत. दररोज या देवीच्या मंदिरात हजारोंच्या संख्येने भाविकांची गर्दी असते तर नवरात्रोस्तव आणि यात्रा उत्सव काळात लाखोंच्या संख्येने भाविक या देवस्थानात आलेले असतात. मात्र यंदा कोरोनामुळे पूर्व खबरदारी घेऊन जिल्हा प्रशासन आणि मंदिर प्रशासनाच्या वतीने ही दोन्ही मंदिरे मार्च पासूनच दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. या महिन्यात सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवात तरी ही मंदिरे दर्शनासाठी खुले करण्यात येतील का? याकडे लाखो भाविकांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र कोरणा चे संकट अध्याप पूर्णपणे टळले नसल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सदर मंदिरे दि. 31 ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here