पावसामुळे मिरी गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान; तलाठी यांनी केली पाहणी…

प्रतिनिधी राष्ट्र सह्याद्री

पाथर्डी: तालुक्यातील प्रगतशील शेतकरी कारभारी पाटील गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली काल मिरी परिसरात पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान यांचे प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्यात आले. एकीकडे कोरोना चे हाल व पावसामुळे शेतकरी राजा हैरान... यात काय करावे..? अशी मिरी परिसरातील शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.

तूर, बाजरी, कांदा, मका, उडीद, कडवळ, कपाशी, डाळिंब ही पिके अक्षरशा: पाण्यामुळे जागेवर सडून नुकसान झाले आहे‌. याची नुकसान एकरी 10 ते 12 हजार शासनाने द्यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. यावेळी कामगार तलाठी मनाळ यांनी प्रत्यक्ष रस्ता नसतानाही पूर्ण चिखल तुडवत शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले. येथील शेतकऱ्यांना किमान या क्षेत्रात दोन ते तीन महिने कुठलेही पीक करता येणार नाही, एवढी दयनीय अवस्था या पावसामुळे झाली आहे. यावेळी प्रगतशील शेतकरी यांनी कृषी अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी परिसरातील नुकसानग्रस्त शेतकरी विजय कुटे, वसंत कोरडे, दुर्योधन वेताळ, गोरक्ष दाणे, अण्णा तोगे, कोंडीराम तोगे, ठकाजी तोगे, अण्णा तागड, दादा तोडमल, बाबासाहेब तोडमल, कारभारी उरडे, विजय महाझरे, मोहन तोडमल आदी शेतकरी बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here