Forest Department: बढतीसाठी वन अधिकाऱ्यांचे पेट्रोल व विषाच्या बाटलीसह धरणे…

गिरीश कल्लेद । राष्ट्र सह्याद्री

बेळगाव: अन्य विभागातील अधिकारी वर्गा प्रमाणेच आम्हालाही सेवा बढती देण्यात यावी, अशी मागणी करत येथील वनविभागाच्या वनसंरक्षण अधिकाऱ्यांनी कामावर बहिष्कार घालून धरणे आंदोलन छेडले होते. बेळगाव येथील वन खात्याच्या कार्यालय आवारात अधिकाऱ्यांनी पेट्रोल आणि विषाची बाटली ठेवून धरणे आंदोलन केले होते.

अन्य विभागातील उपविभागीय अधिकारी आपल्यावर अधिकार चालवित आहेत त्यामुळे आमच्यावर अन्याय होत असल्याची तसेच मानसिक त्रास होत असल्याचे या आंदोलन कर्त्यांनी सांगितले. अनेक विभागात नेमणूक झालेल्या अधिकाऱ्यांना वर्षभरात सेवा बढती देण्यात आली आणि उपविभागीय अधिकारी म्हणून सध्या ते कार्य करीत आहेत. मात्र आम्ही अद्यापही अनेक वर्षे संरक्षक अधिकारी म्हणूनच आहोत. अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. याबाबत अनेक वेळा मागणी आणि निवेदने दिली तरी तसेच संघर्ष केला तरी आम्हाला न्याय मिळाला नाही अशी तक्रारही यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच आम्हाला सेवा बढती तसेच न्याय मिळेपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी वनसंरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेस ही बाब आणणार असल्याचे आश्वासन यावेळी आंदोलन कत्यांना देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here