Parner: कुकडी कालव्यात सापडला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह…

घातपाताचा संशय; निघोज पाठोपाठ दुसरी घटना

दत्तात्रय गाडगे।राष्ट्र सह्याद्री

पारनेर: – पारनेर तालुक्यातील पाडळीआळे गावामधे दि.१ अक्टोबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास एक ३० वर्षीय पुरुष जातीचा मृतदेह आढळला आहे.येथील डेरेमळ्यातील कुकडी कॅनाॅलमधे सकाळी ११ च्या दरम्यान हा अनोळखी मृतदेह आढळुन आल्याची खबर पारनेर पोलीस स्टेशनला बाळासाहेब बबन गुजर वय वर्ष ४०, राहणार पाडळी आळे, ता.पारनेर या शेतकर्‍याने पारनेर पोलीसस्टेशनला दिली.

पारनेर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला.पारनेर पोलीसस्टेशनला याबाबतची अकस्मात मृत्युची नोंद पारनेर पोलीसस्टेशनने केली आहे. कुकडी सापडलेला अनोळखी मतदेह हा नेमका कुणाचा याचा शोध अद्याप लागलेला नाही. कुकडी कॅनाॅमधुन हा मृतदेह डेरेमळा शिवारामधे वाहत आला असावा,असा प्राथमिक अंदाज पोलीसांनी बांधला असुन,मृतदेह नेमका कुणाचा..? यामागे काही घातपात आहे का..? याबाबतचा संशय व्यक्त केला जात आहे.यापूर्वी वडझिरे येथील लेंडीओढ्यामधील विहीर तसेच, निघोज कुंडावर कुकडीच्या पात्रामधेही अनोळखी व्यक्तीचा मतदेह धान्यकोठीमधे आढळला होता.मात्र पोलीसांनी निघोजमधे सापडलेल्या व्यक्तीचा मुलानेच मित्रांच्या मदतीने खुन केल्याचे पोलीस तपासामधे उघड झाले होते.आता अशीच हि सलग तीसरी घटना पारनेरच्या पश्चिमेला पहावयास मिळत आहे.सदर अनोळखी व्यक्तीचा मृत्यु नेमका कशामुळे झाला की काही घातपात झाला याचा तपास पारनेर पोलीसस्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड काॅन्स्टेबल डी.ए.उजागरे हे करत आहेत.दरम्यान निघोजनंतर, पाडळीआळे मधे अनोळखी मृतदेह सापडल्यामुळे पाडळी आळे परीसरामधे घबराटीचे वातावरण पसरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here