कर्जत शहर स्वच्छ आणि सुंदर करून स्वच्छ सर्वेक्षणात मानांकन मिळविण्यासाठी विविध सामाजिक संघटना सरसावल्या

प्रतिनिधी | राष्ट्रसह्याद्री

कर्जत : कर्जत शहर स्वच्छ आणि सुंदर करून स्वच्छ सर्वेक्षणात मानांकन मिळविण्यासाठी विविध सामाजिक संघटना सरसावल्या आहेत. गुरुवारी कर्जत नगरपंचायत परिसरात उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी कर्जत शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी स्वच्छ सर्वेक्षणाची संकल्पना सर्वांसमोर मांडली असता सर्व संघटनांनी या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद दिला.             यावेळी बोलताना मुख्याधिकारी गोविंद जाधव म्हणाले की, स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लोकसहभाग हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे.ही स्पर्धा ३१जानेवारी २०२१ पर्यंत चालणार असून ही सहा हजार गुणांची स्पर्धा आहे.यात लोकसभागासह कचरा व्यवस्थापन, प्रक्रिया, सांडपाण्याचे व्यवस्थापन आदि.या नुसार गुण विभागणी असून आपण शहरात सर्वच बाबतीत चांगले व्यवस्थापन केलेले आहे ते फक्त चांगल्या पद्धतीने मांडून कर्जत ही स्वच्छतेची पंढरी ठरावी अशी कामगिरी सर्वांच्या सहकार्याने करायची आहे. असे जाधव म्हणाले.
         यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष नामदेव राऊत म्हणाले की, लोकसहभाग आणि सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षणाची चळवळ यशस्वी करून कर्जत शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्यासाठी एक मोठी चळवळ आपल्याला उभारावी लागणार आहे.यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.

श्रमदान,वृक्षारोपण,वृक्षसंवर्धन,कचरा व्यवस्थापनातून गांडूळ आणि कम्पोस्ट खत करणे आदी बाबी केल्या जातील.या चळवळीत सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन राऊत यांनी केले आहे. यावेळी सर्व सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी या मोहिमेत सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे. नगरपंचायत आणि काही सामाजिक संघटना यांनी रोज श्रमदान आणि वृक्षारोपण सुरू केले आहे. लवकरच योग्य नियोजन करून ही मोहीम अधिक व्यापक करण्याचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी सांगितले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष विशाल मेहेत्रे, हरित अभियानाचे अनिल तोरडमल, राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयकुमार तोरडमल, आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब रानमाळ, जैन संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार खाटेर, प्रसाद शहा, अभय बोरा, मेडिकल असोसिएशनचे राम ढेरे, शिक्षक संघटनेचे नवनाथ, व्यापारी संघटनेचे अर्जुन भोज, रमेश काकडे, पांडुरंग क्षीरसागर, पत्रकार संघाचे अध्यक्ष मुन्ना पठाण आदी उपस्थित होते.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here